(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांचे २७ वे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिषद भवन, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रकल्प साहाय्यक अधिकारी संतोष गमरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषद रत्नागिरी स्नेहसंमेलन 2023 नुकतेच पार पडले. यामध्ये उत्कृष्ट निवेदन तथा सूत्रसंचलन व कार्यक्रमांचे व्यवस्थापन यासाठी प्रकल्प साहाय्यक अधिकारी संतोष गमरे यांचा विशेष सत्कार करून गौरविण्यात आले. यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजार व जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. तसेच मयुरी पाटील (कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी) यांनी रोख रक्कम २५००/- रुपये पारितोषिक दिले.
Post Views: 3,605