रत्नागिरी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी पदाचा गैरवापर करून काल 200 लसीचे डोस सेनेच्या पदाधिकारी याना दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे
या बाबत माहिती देताना अनिकेत पटवर्धन यांनी सांगितले , काल केतन मंगल कार्यालयात झालेले लसीकरण हे कोरोना नियमाच्या बाहेर झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. जिल्हा परिषद चे आरोग्य अधिकारी डॉक्टर बबीता कमलापुरकर यांनी स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून एका विशिष्ट वॉर्डसाठी 200 लसीचे डोस दिल्याची माहिती पुढे आली आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गावडे यांनी सांगितले की आम्हाला सेनेचे शहरप्रमुख बिपिन बंदरकर यांनी सांगितले की आमचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी बोलणे झालेले आहे. आम्हाला फक्त तुमचे दोन कर्मचारी हवे आहेत. त्याप्रमाणे तालुका अधिकारी यांनी दोन नर्स त्यांना दिले. कारण तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गावडे याच्या म्हणण्यानुसार ते काल नियमाप्रमाणे कोरोन्टीन होते. वरिष्टानी तोंडी आदेशानुसारच ते केलं गेले.
काल एका विशिष्ट वॉर्ड साठीच्या लोकांसाठी हे लसीकरण करण्यात आले. या लसीकरणाचा साठा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बबिता कमलापुरकर यांच्याच ताब्यात असतो. त्यांनी कुठेही लेखी पत्र वा लेखी आदेश न देता परस्पर तोंडी लसीकरणाची परवानगी दिल्याचे समजते .
कालच्या दिवसासाठी अनेकांची ऑनलाईन नोंदणी केली होती. शहरातील काही लोकांना त्यामुळे लस मिळालेली नाही. त्यांना परत जावे लागले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गावडे यांच्या म्हणण्यानुसार केतन मंगल कार्यालयात हे लसीकरण केंद्रच नाही आहे. झाडगाव केंद्रावर गर्दी होते म्हणून तिथे लसीकरण केले जाणार होते. पण त्याची माहिती लोकांपर्यंत जाणे आवश्यक होते.
केवळ एका वॉर्डमधील लोकांसाठी सेनेचे पदाधिकारी लसीकरण करत असतील तर शहरातील बाकीच्या वॉर्डमध्ये लोकांनी काय करायचे ती माणसे नाहीत का ? असा प्रश्न असाही प्रश्न लोक विचारत आहेत .
तसेच केतन मंगल कार्यालयात आलेल्या लोकांची नोंदणी पूर्वी झालेली नव्हती. तर तिथे गेल्यावर दोनशे लोकांच्या नावांची नोंदणी करण्यात आली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी अधिकाराचा गैर वापर करून एका वॉर्ड साठी कसे 200 डोस दिले ?
त्या कुठल्या राजकीय पक्षाच्या आहेत का ? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
दरम्यान भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी याबाबत लेखी मागणी करणार असल्याचेही सांगितले.