(रत्नागिरी / वार्ताहर)
नुकत्याच जिल्हास्तरीय वेटलिप्टींग स्पर्धा घेण्यात आल्या, यात ॲकेडमीला 2 गोल्ड मेडल व 1सिव्हर मेडल मिळवून 3 विद्यार्थ्यांनी यक्ष संपादन केले. विभागीय स्तरावर या तिन्ही विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. 55kg वजनी गटात पार्थ हेमंत जाधव याने स्नँच 50kg व क्लिन अँड जर्क 75kg उचलून प्रथम क्रमांक पटकावला. 73kg या वजनी गटात आदिल काझी याने 35kg स्नँच व 40kg क्लिन ॲड जर्क उचलून दुतीय क्रमांक पटकावला, तर चैतन्य विवेक घाटविलकर याने 35kg स्नँच व 52kg क्लिन ॲड जर्क उचलून प्रथम क्रमांक पटकावला.
घाटविलकर हा विद्यार्थी पटवर्धन हायस्कूलच्या क्रीडा शिक्षिका वैशाली घाटविलकर यांचा मुलगा आहे. ॲकेडमी 5000 स्केअरफुट व सर्व सोईनी सज्ज असलेल्यामुळे त्याचा मुलांना चांगला फायदा होत आहे. त्यांना मार्गदर्शन हेमंत जाधव जे स्वतः पाँवरलिप्टर व वेटलिप्टर आहेत. तिन्ही स्पर्धकांची कुडाळ येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशश्वी मुलांचे ॲकेडमीचे अध्यक्ष भैय्याशेठ उफँ किरण सांमत यांनी अभिनंदन केले असून ॲकेडमीला सर्वप्रकारचे सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. राज्यस्तरावर प्रावीण्य मिळविलेल्या मुलांच्या नोक-यां संबधी व त्यांच्या इतर अडचणींबाबत डायरेक्टर हेमंत जाधव यांना पालकमंत्र्यांकडून आश्वासन देण्यात आले आहे.