(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी व ए जी. दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने ५० वें रत्नागिरी जिल्हा विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होतें. या प्रदर्शनात जिल्ह्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये हातखंबा येथील गुरुवर्य अ. आ. देसाई माध्यमिक विद्यामंदिरमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून कार्यरत असणाऱ्या सौ. आरती गुरुप्रसाद मयेकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात देखील सौ. आरती मयेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यानंतर त्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात निवड झाली होती. नुकतेच जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले आहे. सौ मयेकर यांनी प्रयोगशाळा सहाय्यक या गटामध्ये सहभाग घेऊन विज्ञान पेटी हा प्रयोग सादर केला होता. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन ही त्यांनी बाजी मारत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
यावेळी त्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सौ. मयेकर यांनी पुन्हा एकदा हातखंबा देसाई हायस्कूलचे नाव रोशन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.