(रत्नागिरी)
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाच्यावतीने स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रय इनामदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित निबंध स्पर्धेचा निकाल आज (दि.२८ फेब्रुवारी) रोजी जाहीर करण्यात आला आहे. जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेला विद्यार्थ्यानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यानी पर्यावरण संरक्षणात माझी भूमिका या विषयावर इंग्रजी भाषेत 32 तर मराठी भाषेत 56 निबंध सादर केले.
इंग्रजी निबंध स्पर्धेत देवरुख येथील अरुंधती पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूलची आयुषी युवराज कुरलीकर हिने तर मराठी निबंध स्पर्धेत छत्रपती शिवाजी आदर्श विद्यामंदिर देवरुख नं ४ ची देविशा संभाजी आंब्रे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इनामदार, कार्यवाह प्रभाकर सनगरे, उपाध्यक्ष आर.व्ही.जानकर, कोषाध्यक्ष मोहन पाटील, सर्व तालुका ,जिल्हा पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
उर्वरित निकाल –
इंग्रजी निबंध लेखन- द्वितीय- अनोमा प्रताप जाधव( इंग्लिश मीडियम स्कूल मंडणगड), तृतीय- सानिका नितीन खांबल ( उत्कर्ष विद्यामंदिर शिवणेखुर्द, राजापूर), उत्तेजनार्थ- शेख महंमद सालिक मोहम्मद तौकिक( महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवई, संगमेश्वर)
मराठी निबंध लेखन- द्वितीय- माही गिरीश वनकर ( मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय,साडवली), तृतीय – सार्थक संजय चव्हाण ( जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्रशाळा सांगवे, संगमेश्वर), उत्तेजनार्थ- आर्या भूषण पांचाळ ( न्यू इंग्लिश स्कूल, वेळणेश्वर, गुहागर)