(लांजा)
रत्नागिरी येथे आयोजित, जिल्हा अजिंक्यपद क्युरोगि व पुमसे तायक्वॉंदो स्पर्धेत लांजा तालुक्याने घवघवीत यश संपादन केल आहे. एस.आर.के तायक्वॉंदो क्लब व रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मारुती मंदिर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे नुकतीच स्पर्धा घेण्यात आली. 17,18,19, जून रोजी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत लांजा तालुक्यातील 25 खेळाडू सहभागी झाले होते.
त्यात क्योरोगी म्हणजे फाईट प्रकारात स्पेशल, सब ज्युनिअर, कॅडेट, आणि सिनिअर अशा विविध वजनी गटात खेळाडू…
क्योरोगी (फाईट) प्रकारात तेजस्विनी विरेंद्र आचरेकर (सुवर्णपदक) शौर्य अमित जाधव, शितल विरेंद्र आचरेकर, स्नेहल विरेंद्र आचरेकर तीर्था गणेश यादव (रौप्य पदक) सवाब अमीर जमादार गौरव दिपक खेड़कर, सोहम शशांक भाईशेट्ये, अमान राहुल गांधी (कांस्य पदक)
पूमसे प्रकारात पार्थ योगेश तेंडुलकर, रुद्र अमित सोडये, विराज संजय जाधव, (कांस्य पदक तसेच सहभागी खेळाडू युगा प्रकाश डोर्ले, स्वर्णिम श्रेयश शेटये, श्रीराज संजय जाधव, शुभदा अमोल लाड, काव्या कल्पेश लिंगायत, शौर्य समीर दळवी, नीयाज जमीर जमादार, परी संजय जड्यार , श्लोक संदिप खेडेकर, संचित सुदिप पूरत, गणेश हर्ष शिदें हे सर्व सहभागी होते.
तसेच या सर्व स्पर्धकांना लांजा तालुका तायक्वॉंदो प्रमुख प्रशिक्षक तेजस दत्ताराम पावसकर, सह महिला प्रमूख प्रशिक्षिका तेजस्विनी विरेंद्र आचरेकर, शितल विरेंद्र आचरेकर यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर तायक्वॉंदो फिटनेस अकॅडमी लांजा अध्यक्ष किशोर तुकाराम यादव, उपाध्यक्ष अमोल मारुती रेडिझ, सचिव तेजस्विनी विरेंद्र आचरेकर, सहसचिव अनुजा अरूण कांबळें, सदस्य रोहीत कांबळे, रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेशराव कररा् , सचिव लक्ष्मण के कररा्, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे,खजिनदार शशांक घडशी व सर्व पालकवर्ग आणि लांजावासियांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.