[ रत्नागिरी/ प्रतिनिधी ]
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावर संपन्न झालेल्या तलवारबाजी स्पर्धेमध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित झाडगाव येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या येथील खेळाडूंनी घवघवीत सुयश संपादन केले.
या स्पर्धा झोरे स्पोर्ट्स अकॅडमी मारुती मंदिर रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या वर्षी स्पर्धेमध्ये विद्यालयाच्या 16 खेळाडूंनी विविध गटांमध्ये सहभाग घेतला होता. यातील तब्ब्ल 15 विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर यश संपादन केले असून या सर्व पंधरा विद्यार्थ्यांची विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये विजयी झालेले खेळाडू :
14 वर्षाखालील मुलींमध्ये इप्पी व फॉईल प्रकारात स्वरा शिंदे हीने तृतीय क्रमांक प्राप्त केला असून तिची विभाग स्तरावर निवड करण्यात आली आहे. तसेच मुलांमध्ये इप्पी व फॉईल प्रकारात वीरेन नरके याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. साईराम जाधव याने तृतीय क्रमांक प्राप्त केला असून या दोघांचीही विभाग स्तरावर निवड करण्यात आली आहे.
17 वर्षाखालील मुलांमध्ये फॉईल प्रकारात प्रथमेश लकडे याने प्रथम क्रमांक व सेबर प्रकारात चतुर्थ क्रमांक मिळवला. सौजन्य पाटील याने फॉईल प्रकारात द्वितीय क्रमांक व इप्पी प्रकारात तृतीय क्रमांक मिळवला. सेबर प्रकारात आदित्य डांगे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. आदित्य कोळी याने इप्पी प्रकारात तृतीय क्रमांक व फॉईल प्रकारात चौथा क्रमांक मिळवला. तसेच 17 वर्षाखालील मुलींमध्ये ग्रंथा मोरे हीने इप्पी प्रकाररात चौथा क्रमांक मिळवला. अर्पिता शिंदे हीने सेबर प्रकारात चौथा क्रमांक मिळवला असून या सर्वांची विभाग स्तरावर निवड करण्यात आली आहे.
19 वर्षाखालील मुलांमध्ये स्मित आग्रे याने इप्पी प्रकारात द्वितीय क्रमांक व सेबर प्रकारात चौथा क्रमांक, सनी शिंदे याने फॉईल प्रकारार द्वितीय क्रमांक, मितेश सेन याने इप्पी प्रकारात चौथा क्रमांक व सेबर प्रकारात तृतीय क्रमांक प्राप्त केला. 19 वर्षाखालील मुलींमध्ये हेमांगी पेडणेकर हीने इप्पी व फॉईल प्रकार प्रथम क्रमांक, सिया आग्रे हीने इप्पी व फॉईल प्रकारात द्वितीय क्रमांक तर लक्ष्मी जाधव हीने इप्पी व फॉईल प्रका रात तृतीय क्रमांक मिळवला असून या सर्व खेळाडूंची विभाग स्तरावर निवड झाली आहे.
यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा मार्गदर्शक सैफुद्दीन पठाण, झोरेज स्पोर्ट्स अकॅडमीचे तलवारबाजीचे राष्ट्रीय खेळाडू मार्तंड झोरे, शिक्षक तानाजी गायकवाड, क्रीडा शिक्षक मारुती पाटील, सागर कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष श्री अभयकुमारजी साळुंखे साहेब, सचिवा सौ शुभांगी गावडे मॅडम , आजीव सेवक तथा कोल्हापूर विभागाचे विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कौस्तुभ गावडे, आजीवसेवक व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शशिकांत काटे यांच्याबरोबर हे संस्थेचे सर्व पदाधिकारी विद्यालयाचे सर्व शिक्षक या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा मार्गदर्शक सैफुद्दीन पठाण यांचे अभिनंदन करून विभागस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.