( संगमेश्वर / प्रतिनिधी )
तालुक्यातील समता मंडळ मौजे बोरसुत स्थानिक व मुंबई, माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव, विश्वरत्न,भारतरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील जलसाकार मंडळांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे, या उदात्त हेतूने जिल्हास्तरीय जलसा गीत गायनस्पर्धा बोरसूत संगमेश्वर येथे आयोजन करण्यात आले आहे. दि. १४ मे २०२३ रोजी रात्री ८.०० वाजता ही स्पर्धा संपन्न होणार असून प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या २० जलसा मंडळांना या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे.
या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रोख रु. ८०००/- हजार, आकर्षक सन्मानचिन्ह व गौरवपत्र, द्वितीय पारितोषिक रोख रु. ५०००/-, आकर्षक सन्मानचिन्ह व गौरवपत्र तर तृतीय पारितोषिक रोख रु. ३०००/-, आकर्षक सन्मानचिन्ह व गौरवपत्र देण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थ क्रमांकास रोख रु. १५००/- आकर्षक सन्मानचिन्ह व गौरवपत्र देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट ढोलकपट्ट, उत्कृष्ट हार्मोनियम वादक, उत्तम निवेदक यांना प्रत्येकी रोख रु. ५००/-, आकर्षक सन्मानचिन्ह व गौरवपत्र देण्यात येणार आहे. तर स्पर्धेमध्ये सहभागी सर्व जलसा मंडळांना आकर्षक सन्मानचिन्ह व गौरवपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविण्याची अंतिम मुदत दि.०४ मे २०२२ पर्यंत आहे. परंतु प्रथम येणाऱ्या २० जलसा मंडळांनाच सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी श्री. संतोष गमरे ९४२११४१४१०. संदीप गमरे ९४०४९९३००५ सतीश कांबळे – ९९७५४२६५६८, मनोज गमरे- ८४५९२५४६४३, समीर गमरे ७०२०७५७३६३, सुहास गमरे ७६६६९७६४७२, मनोज जाधव ८९९९४९४९८३ यांचेकडे संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.