(संगलट / इक्बाल जमादार)
दापोली तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात नेहमीच चमकदार कामगिरी करणारी शाळा म्हणून जि.प. अडखळ कदमवाडी शाळा मानली जाते. या शाळेत व्हिजनचे सर्व उपक्रम अगदी आनंदी वातावरणात राबविले जातात. २९ पटसंख्या असलेल्या या शाळेत मुख्याध्यापक मदन रहाटवळ, शिक्षक सुनील जाधव, वैभव बोरकर, मार्गदर्शक विश्रांती फडतरे यांच्या मार्गदर्शनाने इंग्रजीत आत्मविश्वास वाढवणेसाठी इंग्लीश विंग्लिश प्रोग्राम, किंग ऑफ कदमवाडी उपक्रमांतून शिक्षण, शब्द तुमचे गोष्ट माझी, तसेच ज्ञानकुंभ यासह विविध आनंददायी भाषिक खेळ नेहमीच आयोजित केले जातात.
संतोषभाई मेहता आयोजित चित्रवाणी स्पर्धेमध्ये या शाळेच्या यशात तिहेरी मुकुट मिळाला. निबंध स्पर्धेत तन्वी महेश कदम प्रथम तर वक्तृत्व स्पर्धेत आदिती शशिकांत शेळके, प्रथम तसेच तृतीय क्रमांक कु त्रिषा सचीन कदम हिने तृतीय क्रमांक पटकावला. दापोली येथे २ आॅक्टोबर रोजी झालेल्या जिल्हास्तरीय चित्रवाणी स्पर्धेतील यशाबद्दल शाळेचे सर्व स्तरातुन कौतुक होत असून, नुकत्याच मुरुड येथे झालेल्या वक्तृत्व स्पर्धेतही आदिती शेळकेने द्वितीय क्रमांक पटकावला होता. उपक्रमशील शाळेतील सर्व शिक्षकांमुळे सदर शाळेतील मुलांना विविध स्पर्धांमध्ये संधी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे दिसून येते.