(देवरूख /सुरेश सप्रे)
रत्नागिरी तायक्वांदो असोसिएशनच्या मान्यतेने तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमी ऑफ दापोली आयोजित 16 वी क्युरोगी व 10 वी पूमसे रत्नागिरी जिल्हा खुली चॅलेंज तायक्वांदो स्पर्धा सन 2023 सेवाव्रती शिंदे गुरुजी सभागृह नवछात्रालय शिवाजी नगर दापोली या ठिकाणी दिनांक 25 ते 27 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेमध्ये संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर, चिपळूण, खेड, दापोली, मंडणगड, गुहागर, तालुक्यांमधून सुमारे 400 खेळाडू सहभागी होणार असून या स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुक्याच्या संघाची निवड करणेत आली.
या स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुका तायक्वांदो अकॅडमीच्या अंतर्गत नगरपंचायत देवरुख तायक्वां क्लब, पी.एस.बने तायक्वांदो क्लब, निवे तायक्वांडो क्लब, लायन्स तायक्वांदो क्लब, या सर्व क्लबचे खेळाडू संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. निवड झालेल्या खेळाडूंना तालुका अकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ.सुभाष बने, तालुक्याचे आमदार शेखर निकम, रोहन बने, स्मिता लाड. पूनम जाधव, उपनगराध्यक्ष वैभव पवार, आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.