(रत्नागिरी)
राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवीनगर नागपूरच्या मूल्यांकनाच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाच्या वतीने आदर्श विज्ञान छंद मंडळ स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये आदर्श विज्ञान छंद मंडळ जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनि कॉलेज आंबडस (ता.खेड) यांनी प्रथम क्रमांक व वरदान न्यू इंग्लिश स्कूल पालपेणे (ता. गुहागर) द्वितीय क्रमांक प्राप्त केला व राज्यस्तरीय छंद मंडळ स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
स्पर्धेत तृतीय क्रमांक कविता विनोद सराफ हायस्कूल लोटे ( ता. खेड ), चतुर्थ क्रमांक – वसंतराव भागवत माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय मार्गताम्हणे ( ता. चिपळूण), पाचवा क्रमांक – श्रीरामवरदायिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय निरबाडे (ता.चिपळूण ) यांनी प्राप्त केला.
सर्व यशस्वी व सहभागी शाळांचे विज्ञान मंडळाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इनामदार, उपाध्यक्ष राजू जानकर, कार्यवाह प्रभाकर सनगरे, कोषाध्यक्ष मोहन पाटील, मनोज घाग, सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी , शाळांचे मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक यांनी अभिनंदन केले.