जिल्हाधिकारी यांच्या बदलीचा खोटा आदेश काढणाऱ्या संशयिताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीकडून अनेक महत्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या बदलीचा खोटा आदेश सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ उडाली होती. यावर जिल्हाधिकारी यांनी खुलासा करत हा आदेश खोटा असल्याचे सांगितले होते. रत्नागिरी पोलीस दल या घटनेची पाळेमुळे खोदून काढण्यास कामाला लागले होते आणि या प्रकरणातील एका संशयिताच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.
खोटा आदेश सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आपल्या खबरींकडून मिळालेल्या माहितीची सांगड घालत एकाच्या मुसक्या आवळाल्या. पण या संशयिताला ताब्यात घेताच काही धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलीस या मिळालेल्या माहितीची खातरजमा करीत आहेत. लवकरच या घटनेतून काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.