(रत्नागिरी)
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आज ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी प्रशिक्षणार्थी आयएएस डॉ. जस्मीन, प्र. अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रांताधिकारी जीवन देसाई, विजय सूर्यवंशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, तहसीलदार ज्योती वाघ, तहसीलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर, स्वीय सहाय्यक संदीप सावंत यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हावासियांना शुभेच्छा देऊन जिल्हाधिकारी म्हणाले, शासन सदैव आपल्या दारी आहे. जिल्हा प्रशासनाच्या मार्फत तसेच शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रम याचा लाभ नागरिकांनी घ्यावा.
पोलीस परेड ग्राऊंड येथील मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळयानंतर जिल्हा पोलीस दलामार्फत तयार करण्यात आलेल्या ‘सायबर गुन्हयापासून मुलींना करा मुक्त’ या पुस्तिकेचे प्रकाशन तसेच सायबर पोलीस ठाणे, पोलीस नियंत्रण कक्ष व शस्त्रागार नुतन इमारतीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते फित कापून लोकार्पण करण्यात आले.
यावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रशिक्षणार्थी आयएएस डॉ. जस्मीन, प्र. अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रांताधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस दलाला जिल्हा नियोजन मधून दिलेल्या 4 वाहनांचे लोकार्पणही करण्यात आले