(रत्नागिरी)
पुर्वीचे राहणीमान व आताचे राहणीमान यात दिवसागणिक तफावत पडत चाललेली दिसते. त्यातून मानवजातीचे आयुष्य मान कमी कमी होऊन मुत्यदर वाढत चाललेला असून तो रोखण्यासाठी जिम वर्कआउटच करणे येणाऱ्या काळाची गरज बनली आहे असे मत पर्सनल ट्रेनर हेमंत जाधव यांनी व्यक्त केले आहे. जिमचे महत्त्व पटवून देत असताना ते पुढे म्हणाले की सरास आपण फिटनेस साठी रस्त्याने चालत असतो डॉक्टर ही तसाच सल्ला देत असतात. त्यावेळी आपण काही प्रमाणात रक्तातील जास्तीच्या साखरेचे नियंत्रण करत असलो, ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होत असले तरी रोडवरती चालत असल्यामुळे व ओव्हर वेट घेऊन चालत असल्यामुळे जाँईट पेनला आपण निमंत्रण देत असतो. काडीँओव्हासकूलर सिंटीम व हार्टचे फंक्शन सूधारण्यासाठी हार्ट रेटला चाँलेज देऊन वाँकींग करणे आवश्यक असते परंतु तसे होताना दिसत नाही.
मानवाचे शरीर हे मसालने बनलेले असून वय वर्षे 40 शी नंतर आपला मसललाँस चालू होऊन BMI वाढत चाललेला असतो. तो BMI कमी करण्यासाठी व BMR वाठविण्यासाठी मसल वरती रजिस्ट्रन, दबाव पडणें आवश्यक असते. असा दबाव पडून मसल ब्रेक डाऊन करण्यासाठी वेटटेनिंगच आपल्या क्षमतेनुसार करायला पाहिजे आताच्या आधुनिक फिटनेस ॲकेडमीतुन वेगवेगळ्या मशीनरीन मार्फत प्रत्येक मसल वेगवेगळ्या एँगलने शास्त्रोक्त पद्धतीने ब्रेक डाऊन केला जातो अशा मसलला योग्य आहार दिल्यास त्याचा मोठा प्रमाणात फायदा होतो.
हार्ट एक इतर शरीरातील मसलप्रमाणे एक मसल असल्यामुळे त्याला रोज व्यायाम देणे योग्य नाही. आपण एक दिवस वेट ट्रेनिंग, एक दिवस हार्ट टेनींग व एक योगासने प्राणायाम, फ्लेक्झीपीटीचे व्यायाम करणे आवश्यक आहे. असा आपल्या शरीराचा परिपुर्ण फिटनेस ठेवून आपल्याला दिर्घाआयुष्य मिळविण्यासाठी फिटनेस ॲकेडमी सारख्या एखाद्या परिपुर्ण संस्थेत जायला पाहिजे जिथे लेटेस्ट नाँलेज बरोबर प्रोपर व्हेंटिलेटर व इतर सोयी सुविधा असतील असे त्यांनी सांगितले.