(नवी दिल्ली)
Jio आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी लवकरच देशातील बँकिंग सेक्टरमध्ये धुमाकूळ घालणार असून तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी रिलायन्स ग्रुप आता त्यांच्या आर्थिक सेवेचा विस्तार करणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज त्यांची आर्थिक सेवा पुरविणारी, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस ही कंपनी लवकरच शेअर बाजारात सूचीबद्ध करणार आहे. त्यामुळे रिलायन्सच्या शेअरमध्ये तेजी येणार आहे. त्याचा ग्राहकांना मोठा फायदा होईल. ही केवळ साधी आर्थिक सेवा देणारी संस्था नसेल, तर ही देशातील 5 वी मोठी बँका ठरणार आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात त्यांच्या आर्थिक व्यवसायाची एक स्ट्रॅटर्जी ठरवली होती. त्यासाठी एक स्वतंत्र कंपनी गठित करण्याची घोषणा केली होती. आता कंपनी यावर्षी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेससंबंधीची स्ट्रॅटर्जीची घोषणा करणार आहे. जेफरीजच्या दाव्यानुसार, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसचे मार्केट व्हॅल्यूएशन 90,000 ते 1.5 लाख कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. नवीन कंपनीच्या शेअरची किंमत 179 रुपयांच्या जवळपास असेल. तर मॅक्युरी रिसर्चनुसार, नवीन कंपनी झाल्यानंतर जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस देशातील आर्थिक क्षेत्रातील 5 वी मोठी बँका असेल. एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँक यानंतर जिओचा क्रमांक असेल. यंदा एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी या दोघांचे विलिनीकरण होणार आहे. या विलिनीकरणानंतर एचडीएफसी बँक देशातील सर्वात मोठी फायनान्स कंपनी ठरेल.
बजाज, पेटीएम, फोनपेला टक्कर
अँनलिस्ट कंपनी जेफरीजच्या दाव्यानुसार. येत्या काही दिवसांत जिओ फायनान्शिअल सर्व्हिस बाजारात धुमाकूळ घालेल. ही कंपनी बाजारातील सध्याचे स्पर्धक बजाज फायनान्स, पेटीएम, फोनपेला जोरदार टक्कर देईल. जिओचे नेटवर्थ सर्वाधिक असल्य सेक्टरमध्ये जिओ आता पाचव्या स्थानावर असेल. याआधारे जिओ फायनान्शिअल सर्व्हिस पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनाही मागे टाकेल.