जिंदाल कंपनीत काल बॉयलरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागली होती. संबंधित घटना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर तातडीने प्रशासन सतर्क झालं. युद्ध पातळीवर रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. कंपनीत अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आलं. तर नाशिकमधील या जिंदाल कंपनीतील आग बॉयलरचा स्फोट झाल्याने लागल्याचे प्रथमदर्शनी समोर आले होते. मात्र आता या आगीचे कारण वेगळेच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीत लागलेल्या भीषण आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून १९ जण जखमी झाले आहेत. या भीषण अग्निकांडाचे कारण समोर आले आहे. कंपनीतील केमिकल लिकेज होऊन आग लागल्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले होते. या स्फोटानंतर आग लागली. या आगीत दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला असून १७ कामगारांवर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान आगीचे कारण प्राथमिक कारण समोर आले असून केमिकल लिकेज होऊन आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कंपनीत तांत्रिक तपासणी केली जाऊन अधिक तपास केला जाणार असून, त्यानंतर आगीचे खरे कारण समोर येईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आगीची तीव्रता इतकी होती की, आकाशात उंचच उंच आगीचे व धुराचे प्रचंड लोट उसळले होते. यामुळे अनेक विमानांचे मार्गही बदलल्याचे सांगण्यात येत आहे. कसळूबाई शिखरावरूनही या आगीचा धूर दिसत असल्याचा व्हिडीओ समोर आला. आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच-पाच लाखांची मदत दिली जाणार आहे.
इगतपुरीतील जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागली. ही आग पुढे पाच हजार लीटर क्षमता असलेल्या केमिकलच्या दोन टाक्यांना लागल्याने आगीचा भडका उडाला. या दोन्ही टाक्या जळून खाक झाल्यामुळे मोठ मोठे स्फोट होऊन सुमारे दहा किमीपर्यंत जमिनीला हादरे बसत होते. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते. स्फोटाचे हादरे दौंडत, मुंढेगाव, माणिकखांब, मुकणे, पाडळी देशमुख, शेनवड खुर्द, पाडळी फाटा आदि ९ ते १० गावांना बसले. या परिसरातील घरांमधील भांडी, कपाटे खाली पडत असल्याने नागरिकांमध्ये भूकंप झाल्याची चर्चाही सुरू होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीची पाहणी करून याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच-पाच लाख रुपयांच्या मदती घोषणा केली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जिंदाल कंपनीत लागलेली आग भयंकर होती. आगीचे मुख्य कारण शोधून काढले जाईल. याबाबत उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. या आगीत १९ कर्मचारी जखमी झाले असून यापैकी दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे.