( जाकादेवी/वार्ताहर )
रत्नागिरी तालुक्यातील तालुक्यातील जिंदल विद्यामंदिर, रत्नागिरी या प्रशालेय व्यवस्थापनात भारतीय तटरक्षक दल स्थापना दिनाचे औचित्य साधून पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली. सदर स्पर्धा भारतीय तटरक्षक दलाचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व निरिक्षणाखाली घेण्यात आली.
१ फेब्रुवारी हा भारतीय तटरक्षक दल स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षीच्या ४६ व्या स्थापना दिनानिमित्ताने पूर्ण आठवडाभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन भारतीय तटरक्षक दलाचे अधिकारी यांच्या माध्यमातून केले जात आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून क्रिती ताम्ता उपस्थित होत्या. तसेच भारतीय तटरक्षक दलाचे अधिकारी कमांडन्ट(JG) मनिष कुमार,कमांडिंग अधिकारी शिप मिरा बेहन आणि असिस्टंट कमांडन्ट अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन कमांडन्ट राजेश कुमार यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सी.सी.ए. प्रमुख सौ.धनश्री दरडी, तंत्रस्नेही श्री.स्नेहल रसाळ,योगेश निंबाळकर, कलाध्यापक संदेश पालये, युगंधरा तळेकर, क्रीडाशिक्षक रणजीत जाधव यांनी विशेष श्रेय दिले. सदर कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पेद्दान्ना सर यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. तसेच या कार्यक्रमाला विद्यालयाच्या प्राचार्या सौ.त्रप्ती वराठे, पर्यवेक्षक दिपक दरडी, प्रशासक सचिन साळवी, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.