(वैभव पवार / गणपतीपुळे)
रत्नागिरी तालुक्यातील जिंदल विद्यामंदिर शाळेमध्ये दिनांक २६/०१/२०२४ व २७/०१/२०२४ रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वृध्दींगत करण्यासाठी शिक्षण विभाग रत्नागिरी प्रायोजित गोवा विज्ञान केंद्र आणि डाएट रत्नागिरी यांच्या विद्यमाने ‘सायन्स ऑन व्हील ‘ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उदघाटन जे एस डब्लू फाउंडेशनच्या प्रागंणात जे एस डब्लू एनर्जी लिमिटेड वित्त व लेखा वरिष्ठ उपाध्यक्ष लक्ष्मण सी. आर. यांच्या हस्ते पार पाडण्यात आले.
यावेळी जे एस डब्लू एनर्जी प्लांट प्रमुख पेद्दंना, जे एस डब्लू एनर्जी सीएसआर प्रमुख अनिल दधिच, जे एस डब्लू एनर्जी मानव संसाधन प्रमुख प्रफुल्ल पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका तृप्ती वराठे व शाळेचे विज्ञान विषय प्रमुख कल्याणकुमार तिवारी उपस्थित होते. प्रदर्शनात विविध प्रकारच्या विज्ञान प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले होते. यामध्ये सायन्स व्ह्यान प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरले.त्यामध्ये जीवशास्त्र व भौतिकशास्त्र संबंधित माहितीपर प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच सध्याच्या इंटरनेट युगात विद्यार्थ्यांना जलद गतीने विज्ञान विषयक माहिती मिळावी याकरिता विज्ञानाशी संबंधित निरनिराळ्या चित्रफिती दाखविण्यात आल्या.
या उपक्रमामध्ये शिक्षण विभाग रत्नागिरी आश्र्विनी काणे मॅडम तसेच कोतवडे हायस्कूलचे कुंभार सर यांच्यासह जयगड पंचक्रोशीतील माध्यमिक विद्यामंदिर जयगड, द मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे, चाफेरी शाळा नंबर १ ,केंद्र शाळा मिरवणे, जिल्हा परिषद प्रार्थमिक उर्दू शाळा जयगड या शाळांनी बहुसंख्येने उपस्थित राहून उपक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. त्याचप्रमाणे या प्रदर्शनासाठी लागणारे मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका तृप्ती वराठे मॅडम यांच्यासह शाळेचे विज्ञान विषय प्रमुख कल्याणकुमार तिवारी सर, गोवा एज्युकेशन ट्रेनर रोहित निकम सर, सैतवडे शाळेच्या सुवर्णा देशमुख मॅडम, वरवडे शाळेच्या कविता ठाकरे मॅडम तसेच शाळेचे सर्व विज्ञान शिक्षकांनी केले.
या उपक्रमाची सांगता दी.२७/०१/२०२४ रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका वराठे मॅडम यांनी सहभागी सर्व शाळांचे आभार मानून व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानून अतिशय आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.