(गणपतीपुळे / वैभव पवार)
संजय घोडावत कोल्हापूर येथे 27, 28 व 29 रोजी सीबीएसई क्लस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जिंदल विद्या मंदिर रत्नागिरी या प्रशालेतील विद्यार्थी आयुष प्रविण वेलणकर याने लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला व करण विकास चव्हाण याने 800मी. धावणेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. या विद्यार्थ्यांची सीबीएसई नॅशनल स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
या विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक रणजित जाधव व मिथिला मोरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका त्रप्ती वराठे व शाळा समिती अध्यक्ष श्री.पेद्दना यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्या देऊन अभिनंदन केले. तसेच शाळेतील शिक्षक वृंदानीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.