(रत्नागिरी)
जहाजावरची रस्सी तुटून गंभीर दुखापत झालेल्या खलाशाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रामबहाद्दूर चौधरी (वय ५५, रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे नेपाळी मृत खलाशाचे नाव आहे. ही घटना (ता. २२) सकाळी सव्वानऊच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिरकरवाडा येथील अर्मान हंसला या बोटीवरील ३२ खलाशी हे गणपतीपुळे येथील समुद्रात पहाटे चारच्या सुमारास मासेमारीसाठी गेले होते. श्रीक्षेत्र गणपतीपुळे समुद्रात असताना मासे मिळाल्यानंतर बोटीवरिल समुद्रातील जाळ्याचे दोर खलाश्यांसह रामबहाद्दूर ओढत असताना अचानक दोर तुटला व रामबहाद्दूर बोटीवर आपटला त्यांच्या डोक्यावर व कपाळावर गंभीर दुखापत झाली. तत्काळ खलाश्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना त्याचा रविवारी मृत्यू झाला