(राजापूर)
नाटे (ता. राजापूर) येथील जानशी ठुकरुलवाडी येथील घराच्या कंपाऊंडच्या बाजूस झाडीझुडपाच्या आडोशाला विनापरवाना हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली. नाटे पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वसंत शंकर ठुकरुल असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २०) सायंकाळी सहाच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना हातभट्टीची ५४० रुपयांची नऊ लिटर दारु विक्रीसाठी ठेवलेल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी पोलिसांनी नाटे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास नाटे पोलिस अमंलदार करत आहेत.