(नवी दिल्ली)
जागतिक पातळीवर लोकप्रिय नेत्यांच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अव्वल स्थानी आहेत, तसे ते देशांतर्गतही नंबर १ वर आहेत. इंडियन एक्सप्रेस ग्रुपने १०० भारतीयांची यादी प्रसिद्ध केली असून या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या नंबरवर आहेत. तर, देशाचे गृहमंत्री अमित शहांचा दुसरा नंबर लागतो.
या यादीत काँग्रेस नेते राहुल गांधी १५ व्या क्रमांकावर असून अरविंद केजरीवाल हे १६ व्या स्थानी आहेत. या यादीत ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा हे १८ व्या स्थानी आहेत. तर, देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड हे ४ थ्या स्थानावर आहेत. संघ प्रमुख मोहन भागवत (६), मुकेश अंबानी (९), ममता बनर्जी (१३), नीतीश कुमार (१४), टाटा सन्सचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन (२२), काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (२३) व्या स्थानी आहेत. गौतम अदानी (३३), स्मृति ईरानी (३७), तेजस्वी प्रसाद यादव (४०) व्या स्थानी आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील आणि त्यांचे खास असलेल्या काही नेत्यांचा यात समावेश आहे. त्यानुसार, एस जयशंकर (६८), नितिन गडकरी (६५), अश्विनी वैष्णव (५२), किरेन रिजिजू (५१) व्या स्थानी आहेत. तर, एनएसए अजीत डोभाल (७८) व्या स्थानी आहेत. शेवटच्या टप्प्यातील नावांची पाहिल्यास ९७ व्या स्थानावर अभिनेत्री दीपिका पादुकोण, ९८व्या नंबरवर लुलु ग्रुपचे चेअरमन यूसुफ अली, ९९व्या क्रमांक वर आलिया भट्ट आणि १०० व्या स्थानी रणवीर सिंग आहे.