(रत्नागिरी)
रत्नागिरी जिह्यातील दिव्यांग व्यक्तीसांठी (क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक) कार्य करणाऱ्या दिव्यांग युवा क्रिडा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेच्या वतीने दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रयत्नाने सामाजिक कर्तव्य भावना या उद्देशाने जागतिक दिव्यांग दिन व सामाजिक उपक्रम या कार्यक्रमाची सुरुवात खेड शहरातील जिजामाता उद्यान येथील विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांना वंदन करून करण्यात आला.
खेड तालुक्यातील शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड संचलित मातोश्री वृद्धाश्रम आंबये येथील वृद्धांबरोबर सर्व पदाधिकारी यांनी मनमोकळ्या गप्पा मारून चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना मानसिक आधार देऊन संस्थेच्या वतीने सर्वांना फळांचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या या उपक्रमाबद्दल वृद्धांश्रमातील मदतनीस विनोद निवाते यांनी दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेचे सर्व पदाधिकारी दिव्यांग असून देखील वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून रत्नागिरी जिल्ह्यात दिव्यांगान प्रति चांगले कार्य करीत असल्याचे मत व्यक्त केले. तसेच या बद्दल सर्वांचे विशेष आभार मानून सर्वांना जागतिक दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमास दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सावंत, पदाधिकारी सागर आईनकर,जनार्दन पवार, पांडुरंग नाचरे, मंगेश चांदणे, राजेश धारिया, विनोद चांदणे आदी मान्यवर उपस्थित होते. अल्पावधीतच या संस्थेच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींच्या वेगवेगळ्या समस्या सोडवून विविध क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक,सांस्कृतिक उपक्रम यशस्वीपणे राबवून दिव्यांगाना योग्य मार्गदर्शन करून दिव्यांगाच्या न्याय हक्कासाठी व विकासासाठी एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे मार्गदर्शक सल्लागार कौस्तुभ बुटाला महेंद्र सावंत, पल्लवी सावंत, रेणुका गोरीवले,सदस्य हर्षद चव्हाण, अल्पेश तावडे, प्रज्ञा जंगम, उमेश चाळके, रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीचे अध्यक्ष आनंद त्रिपाठी यांनी सर्व दिव्यांगाचे विशेष कौतुक करून आतापर्यंत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमाबद्दल व जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.