(रत्नागिरी)
तालुक्यातील जाकादेवी बाजारपेठ येथे मटका अड्डयावर पोलिसांनी कारवाई केली. कारवाईत साहित्यासह ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
संतोष जानू धामणे (वय ५३) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २९) दुपारी चारच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित जाकादेवी येथील एका हॉटेलच्या पाठीमागील बाजूस मटका घेत असताना सापडला. पोलिसांनी साहित्यासह ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.