(संतोष पवार / जाकादेवी)
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथील पूजा कमिटी, नवरात्र उत्सव मित्रमंडळ आणि ऑल जाकादेवी पुरस्कृत तालुकास्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत मालगुंड येथील डॉ. नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघ विजेता तर रत्नदीप मिरजोळे संघ उपविजेता ठरला.
या स्पर्धेत तालुक्यातील १६ संघांनी सहभाग घेतला होता.अतिशय अटीतटीच्या अंतिम सामन्यात डॉ. नानासाहेब मयेकर फाउंडेशन मालगुंड संघाने ११ गुणांची आघाडी घेत रत्नदीप मिरजोळे संघावर मात करून अंतिम विजेतेपद पटकावले.या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट पकडीचा बहुमान डॉ. नानासाहेब मयेकर संघाच्या श्रेयस बारगुडे याला मिळाला, उत्कृष्ट चढाईचा सन्मान रत्नदीप मिरजोळे संघाचा फैजल जेटी याला देण्यात आला,तर अष्टपैलू खेळाडू म्हणून डॉ. नानासाहेब मयेकर फाउंडेशनच्या किरण जाधव याला घोषीत करुन सन्मानित करण्यात आले.
विजेत्या संघाला युवा नेते व भाजपाचे युवा तालुकाध्यक्ष प्रतिक सुधिर देसाई यांच्याकडून रू.११ हजार १११/- रोख पारितोषिक आणि आयोजकांतर्फे भव्य चषक प्रदान करण्यात आला. उपविजेता संघास सागर गोताड आणि अरुण गोताड यांनी त्यांचे वडिल कै.मोहन गुणाजी गोताड यांच्या स्मरणार्थ ७ हजार ७७७/-चे रोख पारितोषिक आणि आयोजकांतर्फे भव्य चषक देऊन गौरविण्यात आले.
प्रोत्साहित व वैयक्तिक बक्षीसं अष्टपैलू खेळाडू श्री.गुरुकृपा अंडी सप्लायर्सचे प्रो.प्रा. श्री.संतोष धनाजी धामणे यांनी दिले. अमिद आझाद देसाई यांनी वडील कै.आझाद दत्ताराम देसाई यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट पकड व चढाईची बक्षीसं दिली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पूजा कमिटी, सार्वजनिक नवरात्र उत्सव मित्रमंडळ तसेच ऑल जाकादेवी यांचे पदाधिकारी कार्यकर्ते तरुण व युवकांनी खूप मेहनत घेतली.
स्पर्धेचे समालोचन पराग महाडिक, श्री आंबेकर यांनी केले,तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माध्यमिक शिक्षक सुरेश रणदिवे यांनी यशस्वीपणे केले. उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभाला जाकादेवी ओरी येथील प्रसिद्ध उद्योजक व व्यावसायिक सुधिर पर्शुराम देसाई, गावचे सरपंच प्रकाश खोल्ये उपसरपंच कैलास खेडेकर, उद्योजक व खाण व्यावसायिक रोहित कोळवणकर, भाजपाचे युवा तालुकाध्यक्ष प्रतिक देसाई, युवा नेते रोहित मयेकर, बंड्या देसाई, ऋषिकेश उर्फ बंटी सुर्वे, मयुरेश देसाई , किसन नेवरेकर, प्रसाद देसाई, सतिश देसाई, गौरव पटेल, राकेश खेऊर, संदेश खेऊर, सुरेश कातकर,पंचप्रमुख संदेश चव्हाण, पत्रकार संतोष पवार, निवेदक सुरेश रणदिवे, स्थानिक पंच संतोष सनगरे, आशिष सावंत यांसह अनेक मान्यवर, दानशूर व्यक्ती, देणगीदार, क्रीडाप्रेमी नागरिक, रसिक, खेळाडू बहुसंख्येने उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी निखिल देसाई, ओंकार घाणेकर,सुजल देसाई, अभिषेक आखाडे, मयुरेश वरेकर,पपू कुवार, वैभव गोताड , प्रकाश गोताड , अविनाश किंजळे इ.खूप मेहनत घेतली.