जाकादेवी (वार्ताहर) – रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मंगळवारी दि.१३ जुलै रोजी ११० नागरिकांना लसीच्या मात्रा देण्यात आल्या. बीएसएनएलचे नेट स्लो असल्याने अनेक नागरिक सकाळी लवकर येऊनही लसीसाठी काहींना दुपारपर्यंत तर काहींना दुपारनंरही थांबावे लागले. जाकादेवी खालगाव येथे बीएसएनएल सेवा अधून मधून कोलमडण्याचे प्रकार वाढले आहेत. शिवाय नेट येणे-जाणे सातत्याने सुरू असते. या भागात बीएसएनएल इंटरनेट अतिशय स्लो असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आज ११० व्यक्तींना COVAXIN लसीच्या मात्रा नागरिकांसाठी आल्या.
ऑनलाइन रजिस्टरसाठीबी.एस.एन.एल.चे इंटरनेट अतिशय स्लो असल्यामुळे सकाळी लवकर आलेल्या बहुतांशी नागरिकांना लस घेण्यासाठी दुपारपर्यंत तर अनेकांना ४वाजेपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीसाठी थांबावे लागले. नेट स्लो असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश मोरताडे यांनी आपल्या जिओ मोबाईलच्या सिमच्या सहाय्याने ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांनी अनेकांचे ऑनलाईन रजिस्टरही केले. जाकादेवी येथे इंटरनेटची समस्या सतत सुरू असल्याने जाकादेवी विभागातील सामाजिक कार्यकर्ते तसेच भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दत्तात्रय उर्फ काका देसाई, युवा कार्यकर्ते प्रतिक देसाई, बंटी सुर्वे, जाकादेवीतील सायबर कॅफेचे मालक संकेत वायंगणकर यांच्या पुढाकाराने बीएसएनएल फायबर कनेक्शन बसवण्यासाठी या सेवाभावी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे. दोन दिवसात बीएसएनएल सायबर कनेक्शन जोडल्यानंतर जाकादेवी आरोग्य केंद्रात लसीसाठी ऑनलाइन सेवेत येणारा अडथळा दूर होणार आहे. इंटरनेटच्या माध्यमातून नोंदणी सेवा गतिमान होईल असा विश्वासही या नागरिकांनी व्यक्त केला आहे. लसीकरणाची मोहिम यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामधील सर्व स्टाफ, प्राथमिक शिक्षक, शासकीय विभागांचे संबंधित कर्मचारी आणि अधिकारी मेहनत घेत आहेत.