(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयाची गरज ओळखून जाकादेवी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी उत्तम दर्जाची झेरॉक्स मशीन देणगी रूपाने दिली.
जाकादेवी विद्यालयाच्या सन १९९७-९८ च्या १० वी च्या बॅचतर्फे ही झेरॉक्स मशीन देण्यात आली. ही देणगी मिळवण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन मोरे यांनी माजी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले होते.या झेरॉक्स मशीनचे उद्घाटन माजी विद्यार्थ्यांच्या समवेत शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे सचिव विनायक राऊत, कोषाध्यक्ष संदीप कदम, सहसचिव श्रीकांत मेहेंदळे, संस्थेचे संचालक व जाकादेवी विद्यालयाचे सी.ई.ओ. किशोर पाटील, संचालक रोहित मयेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक नितीन मोरे, पर्यवेक्षक शाम महाकाळ, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार आदी तसेच माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांमधून वैशाली देसाई-सुर्वे, अनुपमा शेंड्ये-सरदेसाई,श्री. राजेंद्र मायंगडे यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या स्तुत्य देणगी बद्दल शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी संस्थेच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. उपस्थितांचे स्वागत व आभार मुख्याध्यापक नितीन मोरे यांनी मानले.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी नवनिर्वाचित मुख्याध्यापक नितीन मोरे यांचा शाल, श्रीफळ व बुके देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार यांनी केले. उपस्थितांचे स्वागत व आभार मुख्याध्यापक नितीन मोरे यांनी मानले. यावेळी माजी विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.यामध्ये वैशाली सर्वे ,अनुपमा सरदेसाई .मेघा मोरे, स्वप्नाली पाथरे, शंकर रामगडे ,सदा तांबे, शशिकांत मांजरेकर, सुनिल गोताड, गणेश धामणे, दीपक भागवत, राजेंद्र मायंगडे,निकिता गोणबरे, रमेश घाणेकर, भारती धामणे, केतन घवाळी इ.उपस्थित होते.