(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात रत्नागिरीतील उपविभागीय अधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.
सदरच्या समारंभात इ.१० वी, इ.१२वी सर्वाधिक निकालाची बहुमानाची फिरती ढाल केंद्रातील विजेत्या शाळांना सन्मानपूर्वक पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी संस्थेचे चेअरमन सुनिल मयेकर,व्हा.चेअरमन विवेक परकर, खजिनदार संदीप कदम,सचिव विनायक राऊत, सहसचिव श्रीकांत मेहेंदळे,संचालक व सी.ई.ओ. किशोर पाटील, संचालक आबा पाटील, संचालक रोहित मयेकर, सल्लागार नंदकुमार साळवी, नंदकुमार यादव, अजित पाटील, निमंत्रित संचालक प्रतिक देसाई, संकेत उर्फ बंड्या देसाई, जाकादेवी प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर, पर्यवेक्षक शाम महाकाळ,पोचरी हायस्कूलचे मुख्याध्यापक पांडुरंग पानगले, मालगुंड विद्यालयाचे मुख्याध्यापक नामदेव वाघमारे,चाफे विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश कुळकर्णी,विल्ये शाळेचे ज्येष्ठ शिक्षक कमलाकर हेदवकर, माजी मुख्याध्यापक हनुमंत कदम,यांसह बक्षीस पात्र विद्यार्थी, पालक, विद्यार्थी ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी विषयवार प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले विद्यार्थी, विविध स्पर्धांमध्ये चमकलेले विद्यार्थी, क्रीडा स्पर्धेत सुयश प्राप्त खेळाडू, मार्गदर्शक शिक्षक,कर्मचारी यांना शाळा व संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले.
प्रारंभी प्रमुख पाहुणे डॉ.विकास सुर्यवंशी यांचा शाळा व संस्थेच्या वतीने चेअरमन बंधू मयेकर यांच्याहस्ते शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. दानशूर देणगीदारांनी प्रोत्साहित बक्षीस दिल्याबद्दल शाळा व संस्थेच्या वतीने देणगीदारांना धन्यवाद देण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी डॉ.विकास सूर्यवंशी यांनी गुणवंत विद्यार्थी, १०० % यश प्राप्त शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, मार्गदर्शक शिक्षक यांचे कौतुक करून सर्वच विद्यार्थ्यांनी चिकाटीने अभ्यास करून आपले उचित ध्येय साध्य करण्यासाठी खूप खूप मेहनत करून जीवन समृद्ध बनविण्याचे आवाहन केले. यावेळी संस्थेचे संचालक गजानन पाटील यांनीही आपले विचार व्यक्त केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन संस्थेचे चेअरमन बंधू मयेकर यांनी करून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. स्वागत-प्रास्ताविक मुख्याध्यापक बिपीन परकर यांनी केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार,अरूण कांबळे, अमित बोले यांनी तर आभार पर्यवेक्षक शाम महाकाळ यांनी मानले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व स्टाफने मेहनत घेतली.
फोटो – जाकादेवी प्रशालेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात डॉ. विकास सुर्यवंशी यांचा सत्कार करताना चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर व संस्थेचे पदाधिकारी (छाया -संतोष पवार, जाकादेवी)