( जाकादेवी/ संतोष पवार )
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयाच्या कै.प्रभावती मधुकर खेऊर सभागृहात तरवळ केंद्रांतर्गत जाकादेवी विद्यालयात केंद्रस्तरावर ४० दिव्यांग विद्यार्थ्यांसह जाकादेवी हायस्कूलचे २५० स्पर्धक विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते.
जागतिक अपंग दिनानिमित्त जाकादेवी विद्यालयात चित्रकला, रंगभरण, पाककला व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये दिव्यांसह इतर मिळून तीनशेपेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते.
सदरचा उपक्रम रत्नागिरी पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्याद्वारे आयोजित करण्यात आला होता. प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी खालगावच्या बीट विस्तार अधिकारी सौ. सशाली मोहिते, जिल्हा समन्वयक परविन शौकत (कुरेशी) तसेच अपंग समावेशित टीम यामध्ये विशेषतज्ञ अश्विनी मयेकर, मेघा इंगळे, विशेष शिक्षक नंदकुमार कांबळे, जाकादेवी प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर, पर्यवेक्षक भूपाल शेंडगे, कलाध्यापक तुकाराम दरवजकर, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार, रांगोळी विभागाचे प्रमुख सौ.अस्मिता आयरे, सौ.निला कुराडे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
अतिशय आकर्षक आणि रेखीव काढलेल्या रांगोळी व चित्रकला स्पर्धकांचे पंचायत समितीचे विषय तज्ज्ञ ,विशेष शिक्षक, मुख्याध्यापक, कलाध्यापक इ. कौतुक करून शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाविषयी दिव्यांग विद्यार्थ्यांसह सहभागी विद्यार्थ्यांनी मनस्वी आनंद व्यक्त केला. पंचायत समिती शिक्षण विभागाला धन्यवाद दिले.