जाकादेवी वार्ताहर : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातचे मुख्याध्यापक बिपीन सदानंद परकर यांची जाकादेवी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्याबद्दल श्री.परकर यांचा रत्नागिरी जिल्हा अध्यापक संघाच्यावतीने शाल श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
सदरचा सत्कार जिल्हा अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील व सैतवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रत्नागिरी तालुका अध्यापक संघाचे अध्यक्ष एकनाथ पाटील, तालुक्याचे सचिव पांडुरंग नाईक, संघाचे सल्लागार व माजी मुख्याध्यापक प्रकाश वंजोळे, उपाध्यक्ष संदीप जंगम, सहसचिव राजेंद्र बलेकर, श्री.जाधव यांसह जाकादेवी प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक भूपाल शेंडगे, तुकाराम दरवजकर, नामदेव वाघमारे, शिक्षक प्रतिनिधी अनिल पाटील, शिवानंद गुरव, शिक्षकेतर कर्मचारी शशिकांत लिंगायत , तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेची सर्वव्यापी ध्येय धोरणे, संघटनेची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले. सत्कारमूर्ती बिपीन परकर यांनी सत्काराला उत्तर देताना जिल्हा अध्यापक संघाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सूत्रसंचलन तुकाराम दरवजकर यांनी केले तर आभार भूपाल शेंडगे यांनी मानले.