(जाकादेवी/संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जाकादेवी प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय गीते, क्रांतिकारकांचा जयघोष करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर समूह गीत स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
प्राथमिक गट-
प्रथम- ६ वी ब,( समूह गीत)
द्वितीय- ५ वी ब, (समूह गीत)
तृतीय- संस्कृती कुराडे( ५ वी अ) (वैयक्तिक गीत)
माध्यमिक गट-
प्रथम- ८ वी क (समूह गीत)
द्वितीय- ८ वी अ (समूह गीत)
तृतीय- १० वी अ (समूह गीत)
उच्च माध्यमिक गट-
प्रथम. १२ वी वाणिज्य (समूह गीत)
द्वितीय. ११ वी विज्ञान, (समूह गीत)
तृतीय- १२ वी विज्ञान. (समूह गीत)
इ.स्पर्धेकांनी विजेते पद पटकाविले.
स्पर्धेतील विजेत्या व सहभागी स्पर्धकांचे, मार्गदर्शक वर्गशिक्षकांचे, परीक्षकांचे, सांस्कृतिक विभागाचे, मुख्याध्यापक बिपीन परकर पर्यवेक्षक भूपाल शेंडगे यांनी अभिनंदन केले.