( जाकादेवी/वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात शालेय गुणवत्ता वाढीच्यादृष्टीने कै.सदानंद बळीराम परकर १० दिवशीय विशेष अभ्यास शिबिराला प्रारंभ झाला असून हे शिबीर १६ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.
या अभ्यास शिबिराचे उद्घाटन मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे संचालक व जाकादेवी विद्यालयाचे सी.ई.ओ. किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.प्रारंभी मान्यवरांचे स्वागत शिबीर प्रमुख योगेश चव्हाण, संदीप कुराडे यांनी केले.शिबीराचा उद्देश व अंमलबजावणी याबाबतची माहिती प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर यांनी प्रास्ताविकातून विशेद केली.अभ्यास शिबिराचे उद्घाटक व कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी यावेळी अभ्यास शिबिराची संकल्पना, महत्त्व व उपयोगिता सांगून उपस्थित शिबीरार्थी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांना बहुमोल मार्गदर्शन केले.या अभ्यास शिबीराचे नियोजन काटेकोरपणे राबविण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या. हे अभ्यास शिबीर कै.सदानंद परकर सर यांच्या नावाने सुरु करण्यात आले आहे, त्यामुळे या शिबिरातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत नक्कीच वाढ होईल,अशा विश्वास किशोर पाटील यांनी व्यक्त केला.या शिबिरात इ.१०वी, १२वी चे एकूण ३८३ विद्यार्थ्यांंचा सामावेश आहे.
यावेळी विचार मंचावर प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर, शिक्षण संस्थेचे हितचिंतक प्रकाश कांबळे, ज्येष्ठ शिक्षक भूपाळ शेंडगे, शिबीर प्रमुख योगेश चव्हाण, संदीप कुराडे, शिक्षक प्रतिनिधी अनिल पाटील, शिवानंद गुरव, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार, राहुल यादव यांसह विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.अभ्यास शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, संस्थाचालक मोलाचे सहकार्य देत आहेत.