(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू व खालगाव धामणेवाडी येथील सुपूत्र कु.राज अजित धामणे याने वेटलिफ्टिंगमध्ये विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावल्याने त्याला सिल्वर मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
कु. राज अजित धामणे याला बालपणापासूनच क्रीडा क्षेत्राची प्रचंड आवड आहे. त्याने यापूर्वी जिल्हास्तरावर वेटलेप्टींग क्रीडाप्रकारात प्रथम क्रमांक पटकावला होता. विभागीय स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड या ठिकाणी झाली.या स्पर्धेत राजने सिल्वर मेडल पटकावले. शालेय स्तरावरील विविध क्रीडास्पर्धेत तो हिरीरीने सहभागी होत असतो.
कु.राज धामणे याला क्रीडाशिक्षक संतोष सनगरे ,क्रीडाशिक्षिका सौ. मनिषा धोंगडे यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले.
राज धामणे याला खेळाची आणि व्यायामाची आवड आहे.तो जाकादेवी येथील वारेकर फिटनेस येथे नियमित जीमसाठी जात असतो. बहुमानाचे सिल्वर मेडल पटकावलेल्या राज धामणे याचे व मार्गदर्शक क्रीडाशिक्षकांचे प्रशालेचे मुख्याध्यापक नामदेव वाघमारे, पर्यवेक्षक शाम महाकाळ , शिक्षण संस्थेचे चेअरमन बंधू मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर, सचिव विनायक राऊत, कोषाध्यक्ष संदीप कदम, संचालक व सी.ई.ओ.किशोर पाटील, संचालक रोहित मयेकर, सर्व संचालक , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, ग्रामस्थ यांनी खास अभिनंदन केले.