(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण संस्थेचे माजी खजिनदार तसेच थोर देणगीदार कै. बाबाराम पर्शराम कदम यांची जयंती शिक्षण संस्थेचे उपक्रमशील चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन विवेक परकर, कोषाध्यक्ष संदीप कदम, सचिव विनायक राऊत , संचालक गजानन उर्फ आबा पाटील, संचालक परेश हळदणकर, ॲड.विनय आंबुलकर, ॲड.शाल्मली आंबुलकर, प्रशालेचे मुख्याध्यापक नामदेव वाघमारे, मालगुंड विद्यालयाचे मुख्याध्यापक बिपीन परकर, संस्थेचे हितचिंतक प्रकाश कांबळे, पर्यवेक्षक शाम महाकाळ, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार, संतोष सनगरे यांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
प्रारंभी कै.बाबाराम कदम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी मान्यवरांनी बाबाराम पर्शराम कदम यांच्या दातृत्वाबद्दल तसेच त्यांनी आयुष्यात केलेल्या कार्यकर्तृत्वाबद्दल अनेक वक्त्यांनी गौरव केला. यावेळी शिक्षण संस्थेचे विद्यमान संचालक गजानन उर्फ आबा पाटील यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी निवड झाल्याबद्दल आबा पाटील यांचा जाकादेवी प्रशाला व मालगुंड शिक्षण संस्था तसेच कदम व आंबुलकर कुटुंबीय, मोहिनी मुरारी मयेकर शिक्षण संस्था तसेच प्रकाश कांबळे यांच्यावतीने शाल श्रीफळ बुके देऊन आबा पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी इयत्ता दहावी व बारावी अनुक्रमे तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शक शिक्षकांचा रोख पारितोषिकं देऊन कै. बाबाराम कदम परिवारातर्फे प्रेरणादायी सत्कार करण्यात आला.सत्कारमूर्ती आबा पाटील यांची रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.अध्यक्षीय विचार शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनिल उर्फ बंधू मयेकर यांनी मांडले. ॲड शाल्मली आंबुलकर यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन करून मार्गदर्शक शिक्षक, गुणवंत विद्यार्थी, सत्कारमूर्ती यांचे अभिनंदन करून शिक्षण संस्थेला धन्यवाद दिले.
उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक नामदेव वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष पवार यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक शाम महाकाळ यांनी मानले. यावेळी इयत्ता दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांना कदम परिवारातर्फे रोख रकमेची पारितोषिकं व बुके देऊन गौरविण्यात आल्याने यशवंत विद्यार्थी व पालकांनी कदम परिवार व शिक्षण संस्थेला धन्यवाद दिले.