(चिपळूण)
दरवर्षी पंचायत समितीकडून टंचाईग्रस्त गावांचा आराखडा तयार केला जातो. परंतु तो कागदावरच राहतो. चिपळूण तालुक्यातील १९ गावातील २४ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जून महिना संपत आला तरी पाणी टंचाईच्या संकटाचा ग्रामस्थांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे आजही प्रशासनाकडून टँकरद्वारे या गावांना पाणीपुरवठा करून त्यांची गैरसोय दूर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. गंभीर बाब म्हणजे यामध्ये चिपळूण तालुक्यातील धनगरवाड्यांचा मोठा समावेश आहे.
या टंचाईग्रस्त वाड्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा याकरिता मोदी सरकारच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत या धनगरवाड्यांना समाविष्ट करण्यात यावे, यासाठी रत्नागिरी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड यांना भारतीय जनता पार्टी तर्फे निवेदन देण्यात येणार आहे असे भाजपचे तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर यांनी सांगितले