( रत्नागिरी / प्रतिनिधी )
तालुक्यातील आंग्रे पोर्ट जयगड येथे मालवाहू डंपरमधून माल उतरवताना डंपर पलटी होऊन झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. या अपघातात स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यापकरणी दापोलीतील डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नजीर लाडसाहेब मुल्ला (45, दापोली कोंड, दापोली) असे मृत्यू झालेल्या आणि गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद आफाक इफ्तीकार संसारे (23, जयगड, आझाद मोहल्ला, रत्नागिरी) यांनी जयगड पोलीस ठाण्यात दिली. ही घटना 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नजीर मुल्ला हे आपल्या ताब्यातील डंपर घेऊन आंग्रे पोर्ट येथील प्लांटमध्ये गेले होते. त्यांनी प्लांटमध्ये निष्काळजीपणे चुकीच्या पध्दतीने लावून डंपरमधील माल प्लॉटमध्ये उतरवत होते. यावेळी डपंरचा हायड्रॉलिक पाईप फुटल्याने डंपर पलटी होऊन त्यात मुल्ला यांचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद आफाक संसारे यांनी जयगड पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी नजीर मुल्ला याच्यावर भादविकलम 304 (अ), 337, 338 नुसार गुन्हा दाखल करण्यात आले.