आपली जमीन एखाद्या सरकारी प्रकल्पात जात असेल जसं की महामार्ग, धरणं किंवा इतर कामांमध्ये जात असेल तर त्या जमिनीचं सरकारी बाजारमूल्य माहिती असणं गरजेचं असतं. याशिवाय जमिनीची खरेदी-विक्री करतानाही आपल्या भागातील जमिनीचा सरकारी दर ठाऊक असणं गरजेचं असतं. याहीपलीकडे जाऊन एखाद्या शहरात आपल्याला दुकानासाठी किंवा ऑफिससाठी गाळा खरेदी करायचा असेल, तर त्या भागातील जमिनीचा सरकारी दर माहिती असणं आवश्यक असतं.
जमिनीचे दर –
आता तुम्ही घरबसल्या 5 मिनिटात महाराष्ट्रातील सर्व भागातील सरकारी जमिनीचे दर पाहू शकता. गावातील जमिनीचा सरकारी दर पाहण्यासाठी आधी तुम्हाला igmaharashtra.gov.in सर्च करावे लागेल. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाची वेबसाइट तुमच्यासमोर उघडेल. या वेबसाइटच्या डाव्या बाजूला महत्त्वाच्या लिंक्स दिसतील. तुम्हाला इन्कम असेसमेंट ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमच्यासमोर मार्केट प्राइस रेट शीट नावाचे एक नवीन पेज उघडेल. या पेजवर महाराष्ट्राचा नकाशा दिला जाईल. आता आपल्याला जिल्ह्यातील जमिनीची सरकारी किंमत पाहायची आहे, तर आपल्याला जिल्ह्याच्या नावावर क्लिक करावं लागेल.
आता समजा मला रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनीची सरकारी किंमत बघायची आहे, म्हणून मी रत्नागिरी या नावावर क्लिक करेन. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन टॅब, एक नवीन पेज ओपन होईल. सर्वप्रथम, तुम्हाला या पानाच्या डाव्या बाजूला असलेल्या वर्ष कॉलममध्ये वर्ष निवडावे लागेल. आता वर्ष निवडावे लागेल. उजवीकडील भाषा स्तंभावर जाऊन तुम्ही येथे मराठी भाषा निवडू शकता.
त्यानंतर तुम्ही निवडलेल्या जिल्ह्याचे नाव येथे आपोआप दिसेल. यानंतर तालुक्याचे आणि गावाचे नाव निवडायचे आहे.
जर तुम्ही गावाचे नाव निवडले तर खाली तुम्हाला तुमच्या गावातील सरकारी जमिनीच्या किमती दिसतील. हे सुरुवातीला मूल्यांकन प्रकारात जमिनीचा प्रकार दर्शवेल. त्यानुसार, पुढील मूल्यांकन मर्यादा आणि दर म्हणजेच जमिनीची सरकारी किंमत दिली जाईल. येथे दिलेली किंमत प्रति हेक्टर आहे. येथे तुम्हाला शेतीयोग्य जमीन, बागायती, एमआयडीसी अंतर्गत जमीन, महामार्गावरील जमिनीचे सरकारी दर मिळू शकतात. मूल्यांकन श्रेणीनुसार जमिनीच्या किमती वर-खाली होत आहेत. तर मूल्यांकन मर्यादा ही तुमच्या जमिनीचे प्रति हेक्टर आकार आहे.
शहरातील दर कसे तपासायचे?
आता शहराच्या विशिष्ट क्षेत्रातील जमिनीचे सरकारी दर पाहू. हे करण्यासाठी, आपण या पृष्ठावर परत जाणे आवश्यक आहे.
आता उदाहरणार्थ, मी ……जिल्ह्याची निवड केली आहे. तालुका ….. आणि गावाचे नाव महानगरपालिका/नगरपालिका …… म्हणून निवडण्यात आले आहे. सुरुवातीला सर्व्हे नंबरवर क्लिक केल्यावर त्या उपविभागात दिसणार्या सर्व्हे नंबरची नावे दिसतील. येथील उपविभागाच्या नावाप्रमाणे -उदा. “12.171 (ब) – ….वाडी गाव सोडून …वाडी सिडको परिसरातून इस्टेट …….पासून जाणाऱ्या रस्त्यावर.” (igr valuation) आणि नंतर जमिनीचे दर प्रति चौरस मीटर युनिटमध्ये दिले जातात. उदाहरणार्थ, खुली जमीन असल्यास, जमिनीची सरकारी किंमत 14300 रुपये प्रति चौरस मीटर, निवासी सदनिका 30500 रुपये, कार्यालय 35500 रुपये, दुकाने 53000 रुपये प्रति चौरस मीटर आहे.
अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शहराच्या विविध भागातील सरकारी जमिनीचे दर पाहण्यासाठी पृष्ठ 1, 2, 3, 4 वर क्लिक करू शकता.
सरकारी दर का कळावेत?
जमिनीची सरकारी किंमत बाजारभावापेक्षा कमी असेल, तर या किमतीनुसार जमीन कुठून मिळेल, असा प्रश्न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे. मात्र “जमिनींचे सरकारी दर कमी आहेत. ते वाढवायला मर्यादा आहेत. हे दर सरकारी नियमांनुसार ठरलेले आहेत. त्यासाठी मागील वर्षीचे व्यवहार विचारात घेतले जातात. जमिनीचा सरकारी दर हा त्या जमिनीची किमान किंमत आहे. त्यापेक्षा कमी किंमत असेल तर सरकार दरबारी अवमूल्यन समजले जाते.” मात्र सर्वांना त्या-त्या जमिनीची सरकारी किंमत मीहिती असावी असा सरकारचा प्रयद्न असतो.