(फुणगूस/एजाज पटेल)
संगमेशवर तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथे जमातुल मुस्लिमीन आंबेड बुद्रुकच्या वतीने नवनिर्वाचित ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा सत्कार अण्णा सामंत यांच्या हस्ते रविवार दिनांक 18 रोजी करण्यात आला. ग्रुप ग्रामपंचायत आंबेड बु चे सरपंच सुहास मायिंगडे, उपसरपंच शोएब भाटकर, सदस्य काशीराम कानर, सुरेश किंजले, नुपूरा मुळ्ये, साक्षी शिगवण, पूजा मोहिते व तंटामुक्ती अध्यक्ष निसार केळकर यांचा सत्कार या वेळी करण्यात आला.
यावेळी अण्णा सामंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आपल्या गावातील कोणतेही विकास काम करीत असताना माझ्याकडून सहकार्य असेल आणि त्यासाठी कोणी मोठया लोकप्रितीनिधीची गरज नसून साधारण व्यक्ती सुद्धा माझ्या दारात आला, तर माझे दरवाजे नेहमी खुले राहणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी पुढील वाटचाली साठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. सामाजिक कार्यकार्यें युयुतसू आर्ते या वेळी म्हणाले की, ग्रामपंचायतची कामे ही छोटे मोठे होतच असतात, परंतु वेगवेगळ्या क्षेत्रातील आपल्या गावातील व्यक्ती आपल्या गावाचे नाव पुढे कसे घडवेल अशी संकल्पना ग्रामपंचायती मार्फत राबवावी गरजेचे आहे. जेणेकरून कला, क्रीडा संस्कृत कार्यक्रम, नवनवीन उद्योगाच्या माध्यमातून आपल्या लोकांना काम मिळेल. तसेच आर्ते यांनी आपल्या भाषणामध्ये उपसरपंच शोहेब भाटकर यांचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाला उपस्थित आंबेडचे माजी सरपंच अकबर आंबेडकर यांनी आपल्या काळातील ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी सांगितले की, कशा प्रकारे गावामध्ये एकोपा आणि ध्येय धोरण असावे. तसेच निवडून आलेल्या सर्वांना त्यांनी मार्गदर्शन केले व आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
या सत्कार समारंभाला गावचे गाव प्रमुख प्रवीण मुळ्ये, सर्व खोत मंडळी, प्रत्येक वाडी चे वाडी प्रमुख, कुरधुडा गावचे जमूरत अलजी, तैमूर अलजी, इब्राहिम अलजी, आंबेड मोहल्या चे खालिद बोट, कादिर केळकर, अब्दुल बोट, आमीर आंबेडकर, वाहिद फकीर, कसम भाटकर, डॉ सलीम सय्यद व इतर कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होते. कार्यकर्माचे सूत्र संचालन खातू गुरुजी यांनी केले व शेवटी जमातीचे अध्येक्ष इब्राहिम आंबेडकर यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.