(रत्नागिरी)
भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सात दिवसीय निवासी शिबीराचे उद्घाटन भारत शिक्षण मंडळाचे कार्यकारिणी सदस्य राजेंद्र कदम यांच्या हस्ते जि.प.केंद्रशाळा खेडशी नं १ येथे करण्यात आले. यावेळी सरपंच सौ.जान्हवी घाणेकर, उपसरपंच सौ. मानसी पेडणेकर, ग्रामसेवक संजय लोखंडे, जि.प. केंद्रशाळाचे केंद्रप्रमुख विनोद कडवईकर, माजी सरपंच भिकाजी गावडे , सौ.गावडे, भारत शिक्षण मंडळाचे कार्यकारिणी सदस्य विनायक हातखंबकर, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्पाधिकारी हरेश केळकर, ग्रामपंचायत सदस्य, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहाय्यक प्रकल्पाधिकारी सौ. ऋतुजा भोवड यांनी केले. सरपंच सौ.जान्हवी घाणेकर, माजी सरपंच भिकाजी गावडे यांनी श्रमसंस्कार शिबीरासाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे कार्यकारिणी सदस्य विनायक हातखंबकर जबाबदारीच्या भावनेतून स्वयंसेवकांनी काम करावे असे सांगितले व खेडशी गावचे सुपुत्र अप्पा सावंत यांच्या जयंतीदिनी शिबीराचे उद्घाटन होत आहे याचा आनंद व्यक्त केला. संस्थेचे कार्यकारिणी सदस्य व उदघाटक राजेंद्र कदम यांनी स्वयंसेवकांनी उत्कृष्ट काम करुन महाविद्यालयाचे नाव मोठे करा, अशा शुभेच्छा दिल्या.
केंद्रप्रमुख विनोद कडवईकर यांनी श्रमसंस्काराचा शिबीराचा स्वयंसेवकांनी आनंद घ्यावा असे सांगितले. ग्रामसेवक संजय लोखंडे यांनी प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये कला आहे त्याकडे स्वयंसेवकांनी बारकाईने पहावे असे सांगितले. प्रभारी प्राचार्या सौ.मधुरा पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे.तो विद्यापीठाद्वारे चालवला जातो. श्रम हा एक संस्कारांमधील महत्वाचा संस्कार आहे. विद्यार्थ्यानी ग्रामजीवनाचा अनुभव घ्यावा यासाठी हे शिबीर आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव कीर यांनी केले तर प्रा.मिथिला वाडेकर यांनी आभार मानले.