(जैतापूर / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील कोंबे मिरगुलेवाडी येथील दोन वर्षांपूर्वी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. आपल्या सख्ख्या जन्मदात्री वयोवृद्ध आईसोबत त्या नराधम मुलाकडून गैरकृत्य करण्यात आले होते. सागरी पोलीस ठाणे नाट्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप काळे, कुशल हातीसकर आणि अन्य सहकाऱ्यांनी घटनेची खबर लागताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्या नराधमाला अटक करून कायदेशीर कारवाई केली होती.
हे गैरकृत्य करणाऱ्या संजय विष्णू मिरगुले वय 40 याच्यावर भा.द.वि.क. – 376,504,506 गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई केली होती. रत्नागिरी जिल्हा न्यायालयात त्याच्याविरुद्ध खटला सुरू होता रत्नागिरी जिल्हा न्यायदंडाधिकारी जोशीसो यांच्या न्यायालयाने आरोपीला भा.द.वि.क 376प्रमाणे 10 वर्ष सश्रम कारावास 5000 रूपये दंड ,दंड न भरल्यास 06 महीने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणाचा तपास तपास पोनी दिलीप काळे, पोलीस नाईक कुशल हातिसकर यांनी केला होता तर प्रभारी अधिकारी सपोनी अविनाश केदारी, सरकारी वकील श्री कानिटकर ( सेवानिवृत), चार्ज श्रीमती प्रभु मॅडम,जिल्हा पैरवी- सपोनी पाटील मॅडम कोर्ट पैरवी पोलीस कॉन्स्टेबल ठोके यांनी कामकाज पाहिले