आईने आपल्या दोन चिमुकल्या मुलांचा झोपेत गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिने ही हत्या का केली याचे कारण समजू शकलेले नाही. ही महिला मनोरुग्ण असल्याचे समजत असून तिला अटक करण्यात आली आहे. औरंगाबाद येथे ही खळबळजनक घटना आज उघडकीस आली. तिने ही हत्या का केली याचे कारण समजू शकलेले नाही. ही महिला मनोरुग्ण असल्याचे समजत असून तिला अटक करण्यात आली आहे.
अदीबा फहाद बसरावी (वय ८), अली बिन फहाद बसरावी (वय ४) असे खून झालेल्या दोन भावंडांची नावे आहेत. औरंगाबाद शहरातील सादात नगर परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार दोन अल्पवयीन सख्या बहिणभावाचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मुलगी अदीबा आणि मुलगा अली रविवारी रात्री कुटुंबीयांसोबत जेवले आणि त्यानंतर आपल्या खोलीत जाऊन झोपले. दुसऱ्या दिवशी दुपारचे बारा वाजले तरी दोघे खोलीतून बाहेरच आले नाहीत. त्यावेळी त्यांची आई त्यांना उठवण्यासाठी गेली. मात्र, दोघेही बेशुद्ध असल्याचे आढळल्याने त्यांना तात्काळ येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुलांचा मत्यू नेमका झाला कसा? याचा शोध घेण्यासाठी तपास पथक स्थापन केले. तपासात धक्कादायक माहिती पुढे आली. दोन्ही मुलांच्या जन्मदात्या आईनंच रात्री मुलांची गळा दाबून हत्या केल्याचं स्पष्ट झाले आहे. दरम्यान तिने आपल्या मुलांचा खून का केला याचे कारण पोलिसांना समजू शकले नाही. पोलिसांनी आरोपी आईला अटक करण्यात आली असून पुढील तपास औरंगाबाद पोलिस करत आहेत.