(पालघर)
काल देशभरात कृष्णजन्माष्टमी व दहीहंडीचा उत्साह असताना पालघरमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. येथे दोन सख्ख्या बहिणींचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. या महिला जनावरांना चारा आणण्यासाठी नदीकिनारी गेल्या होत्या मात्र नदीच्या प्रवाहात त्या वाहून गेल्या. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामधील दह्याळे गावात हीघटना घडली आहे. दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
गंगी करबट (वय ६०) आणि गुलबी दांडेकर (वय ५८) अशी दोन मृत बहिणींची नावे आहेत. दोघी नदीकिनारी असलेल्या शेतात चारा आणायला गेल्या होत्या. त्यावेळी नदीचा प्रवाह वाढल्याने त्या नदीत पडल्या व नदीचा प्रवाह गतिमान असल्याने दोघी वाहून गेल्या. एकीचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आलं असून दुसरी अजून बेपत्ता आहे. पालघरमध्ये गेल्या आठवड्यापासून पावसाने हजेरी लावल्याने नदीपात्र वाढले आहे. या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दुर्घटना घडली आहे.
कासा पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे. दोन बहिणी जनावरांसाठी चार आणण्यासाठी गेल्या होत्या मात्र अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे दोघीही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या.