( नवी दिल्ली )
‘पोर मोई’च्या विश्लेषणात सर्वाधिक आकर्षक व्यक्तींमध्ये भारतीय महिला आणि पुरुषांचा समावेश करण्यात आला आहे. परकियांच्या सुंदर आकर्षक व्यक्तीमत्वाने हुरळून जाण्यापेक्षा भारतीयच सर्वाधिक आकर्षक असल्याचे शिक्कामोर्तब इंग्लडच्या ‘पोर मोई’ने केलेल्या विश्लेषणात करण्यात आले आहे. नुकतेच विश्लेषण केलेल्या ५० आकर्षक दिसणार्या देशांची यादी जाहीर करण्यात आली त्यात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिका दुसर्या, तर ब्रिटन तिसर्या क्रमांकावर आहे. ‘पोर मोई’च्या विश्लेषणानूसार जपान चौथ्या स्थानावर, तर कॅनडा पाचव्या स्थानावर आहे.
सौंदर्याच्या बाबतीत भारताने अमेरिकेसह जगभरातील देशांना मागे टाकले आहे. नुकतीच ५० आकर्षक दिसणा-या देशांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिका दुस-या, तर ब्रिटन तिस-या क्रमांकावर आहे. पोर मोई या प्रसिद्ध स्विम वेअर ब्रँडने ही स्टडी केला आहे. या अहवालानुसार जपान चौथ्या स्थानावर, तर कॅनडा पाचव्या स्थानावर आहे.
कसे ठरवले सौंदर्याचे निकष?
सर्वात आकर्षक व्यक्तिमत्त्वे निवडण्यासाठी सोशल मीडिया न्यूज एग्रीगेटर प्लॅटफॉर्म रेडीटवर दिसणा-या पोस्टचे विश्लेषण करण्यात आले. ज्यामध्ये विविध देशांतील लोक होते. या पोस्टवरील कमेंटमध्ये येणा-या आकर्षक, सुंदर, देखणा, भव्य, गुड, हॉट आणि सेक्सी अशा शब्दांच्या आधारे त्यांचा स्कोअर तयार करण्यात आला.
ब्रिटन पहिल्या १० मध्येही नाही
याच वृत्तानुसार, सुंदर दिसण्याच्या बाबतीत एकूण देशांच्या यादीत ब्रिटन पहिल्या १० मध्येही स्थान मिळवू शकले नाही. तथापि, ब्रिटनचे पुरुष खूपच आकर्षक मानले गेले आहेत आणि पुरुषांच्या यादीत ब्रिटनला पहिल्या स्थानावर ठेवण्यात आले आहे.
पुरूषांच्या यादीत भारत दुसरा
पुरुषांच्या यादीत भारत दुस-या, इटली तिस-या, अमेरिका चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार अमेरिकेपाठोपाठ स्वीडन, जपान, फ्रान्स, आयर्लंड, बेल्जियम आणि ब्राझीलचा क्रमांक लागतो. या स्टडीमध्ये देशाव्यतिरिक्त सुंदर महिला आणि देखण्या पुरुषांचीही स्वतंत्र यादी जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय महिला ठरल्या अव्वल
या यादीत भारतीय महिलांचे वर्णन जगातील सर्वात सुंदर म्हणून करण्यात आले आहे. जगातील सर्वात सुंदर महिलांच्या बाबतीत जपान दुस-या क्रमांकावर आहे. त्यामध्ये स्वीडन तिस-या, पोलंड चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच वेळी, इटलीच्या महिला पाचव्या क्रमांकावर आहेत. विविध देशांचे सौंदर्य दाखवण्यासाठी एआयचा वापर करण्यात आला आणि यातून त्यांची चित्रे प्रसिद्ध झाली.