(नाणीज / वार्ताहर)
श्री क्षेत्र नाणीजधाम येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या पुढाकारातून ३१ वे मरणोत्तर देहदान करण्यात आले. १७ नोव्हेंबर २२ रोजी कल्याण (पश्चिम )येथील कै. विजय नारायण टेमकर (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे देहदान करण्यात आले.
माणसाने मृत्यूनंतरही लोकांच्या उपयोगी पडावे या भूमिकेतून जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यानी संप्रदायाला मरणोत्तर देहदान करण्याचे आवाहन केले होते. विशेषतः वैदकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो असे म्हटले होते. जगद्गुरूंच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. हजारो अर्ज संस्थानकडे दाखल झाले. त्यातील ३१ जणांचे आजपर्यंत निधन झाले आहे. त्यांचे मरणोत्तर देहदान करण्यात आले.
१७ नोव्हेंबर रोजी विजय टेमकर यांचे निधन झाले. त्यांच्या कन्या सौ. दीपिका बोंबले (दक्षिण ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष) यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाशी संपर्क साधला. त्यानंतर एमजीएम मेडिकल कॉलेज , कामोठे, कळंबोली, नवी मुंबई या वैद्यकिय महाविद्यालयाकडे वडिलांचा देह सुपूर्द केला. या निर्णयाबद्दल सौ. दीपिका भरत बोंबले आणि त्यांच्या परिवाराचे संपूर्ण संप्रदायाच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या वडिलांच्या आत्म्यास चिर:शांती लाभो, आशा भावना व्यक्त करण्यात आल्या.
कै. टेमकर यांच्या पश्चात मुलगा विजय नारायण टेमकर, त्यांचा दोन मुली दीपिका भारत बोंबले, निमिषा धीरज भोईर, सून अर्चना राकेश टेमकर, नातवंडे असा मोठा परिवार आहे. देहदान करतेवेळी नातेवाईक आणि जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संप्रदायाचे पदाधिकारी पुरुषोत्तम हवल ( आय टी प्रमुख), श्री प्रकाश अंजर्लेकर ( जिल्हा निरीक्षक), संजय घोडविंदे ( जिल्हा अध्यक्ष ), भाऊ कदम व शिवाजी करकरे ( निरीक्षक ) व सागर गोरेगावकर ( तालुका प्रमुख) आदी उपस्थित होते.
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कल्पनेतून पुढे आलेल्या संस्थांनाचा मरणोत्तर देहादान हा उपक्रम जनमाणसामध्ये यशस्वी होऊ लागला आहे. सप्टेंबर २०१६ पासून नोव्हेंबर २०२२ पर्यंत संस्थानतर्फे ३१वे मरणोत्तर देहदान समाजाच्या सेवेसाठी वैद्यकीय महाविद्यालयास सुपूर्द करण्यात आले.