(परभणी)
जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांतर्फे सिमुरगव्हाण (ता. पाथरी) येथे बुधवारी श्री दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी संस्थानच्या सामाजिक उपक्रमातर्गत मराठवाड्यातील १८ शाळांना संगणकाचे वाटप करण्यात आले.
संस्थानच्या मराठवाडा पिठातर्फे या सपूर्ण सोहळ्याचे नियोजन करण्यात आले होते. सकाळी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या हस्ते श्री दत्ताची विधिवत पूजा केली, दर्शन घेतले. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सायंकाळी ६ पासून दत्त जन्मोत्सव सोहळा झाला. यावेळी भाविकांची प्रचंड गर्दी होती. सायंकाळी मुख्य कार्यक्रमात संस्थानच्या सामाजिक उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील १८ शाळांना संगणकाचे वाटप करण्यात आले. त्यासाठी विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन शाळांची निवड करण्यात आली होती. उपस्थित नामवंतांच्या हस्ते हे वाटप झाले.
रात्री पिठाचे उत्तराधिकारी प.पू. कानिफनाथ महाराज व जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांची प्रवचने झाली. त्यांनी श्री दत्तात्रेय यांच्या वैशिष्टयांची ओळख करून दिली. सद्गुरूंचे आपल्या आयुष्यात असलेले महत्व सांगितले. सद्गुरू आपले मन संतुलित ठेवतात. त्यासाठी त्यांचे मार्गदर्शन महत्वाचे असते, असे ते म्हणाले. त्यानंतर चरण दर्शनानंतर सोहळ्याची सांगता झाली. सोहळ्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. भव्य मंडपही अपुरा पडला. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते