(लातूर)
शिराळा जि. लातूर येथील राधाबाई जनार्दन माने (वय ५२) यांचे आज निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान करण्यात आले. जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून झालेले हे ४९ वे देहदान आहे.
कै. माने यांचे कुटुंबीय व महाराजांच्या स्वस्वरूप संप्रदायाचे जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन हे देहदान केले. त्यांचा देह डेरवण ता. चिपळूण येथील विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या भ. क. ल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी कै.माने यांचा मुलगा भरत जनार्दन माने, तीन मुली- उर्मिला मोहन पवार, स्वाती बिभीषण जावळे, सरिता श्रीराम कदम, नात संजीवनी श्रीराम कदम, पुतण्या अंगद हनुमंत माने, राजाभाऊ रामभाऊ माळकरी आदी उपस्थित होते. संप्रदायाचे मुख्यपीठ युवा निरीक्षक अविनाश मधुकर जागुष्टे, ज.न.म. प्रवचनकार महेंद्र राजाराम कदम, सेवाकेंद्र अध्यक्ष सवर्डेचे संतोष बिजितकर, याशिवाय भक्तगण विजय बागवे, अमित सुर्वे, सौ. अश्विनी मोरे, सौ. भाग्यश्री सुर्वे आदी उपस्थित होते. सर्वांनी देह महाविद्यालयाच्या आरोग्यशास्त्र विभाग प्रमुखाकडे सुपूर्द केला.
जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांनी भक्तांना मृत्यूनंतरही देहदान करून लोकांच्या उपयोगी पडण्याचे आवाहन केले होते. तुमचा मृतदेह वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उपयोगी पडू शकतो. या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. संस्थांकडे देहदनाचे ५६७३७ अर्ज दाखल झाले होते. ते जवळच्या वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. आजवर त्यातील ४९ जणांनी मरणोत्तर देहदान केले आहे.
फोटो :
शिराळा जि. लातूर येथील राधाबाई जनार्दन माने यांचा मृतदेह डेरवण येथील वालावलकर वैद्यकीय महाविद्यालकडे सुपूर्द करताना नातेवाईक व संप्रदायाचे पदाधिकारी.