(राजापूर)
राजापूर तालुक्यातील ( जि.रत्नागिरी) ओणी येथे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानतर्फे महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण जनार्दन परबकर (पोलीस निरीक्षक राजापूर) तसेच ओणी गावच्या सरपंच सौ.सारिका लिंगायत यांच्या हस्ते 8 ऑगस्ट रोजी करण्यात आला.
या कार्यक्रमाला आरोग्य सहाय्यक श्री.बल्लाळ, ओणी गावचे उपसरपंच श्री.राजाराम दुडये, पोलीस पाटील श्री.संजय लिंगायत, तंटामूक्ती अध्यक्ष श्री.सुभाष सुर्वे, श्री.जड्यार,माजी पं.स.सदस्य श्री.प्रतिक मटकर, मयुरेश साखळकर, रामचंद्र पाटील, तसेच जिल्हा सेवा समितीचे कर्नल व दक्षता अधिकारी श्री.राजेंद्र खांबल, आ.प्रमुख श्री.गुळेकर, सा.प्रमुख श्री.चिंतामणी साखळकर , राजापूर तालुका सेवाध्यक्ष श्री.संतोष वाडकर यांच्यासह श्री.नीळकंठ थळेश्री, सागर वाडकर, सचिन पावसकर, प्रसाद राजाध्यक्ष , पाटील सर, प्रविण बांदरकर, जगन्नाथ पड्यार, सुधाकर आयर, प्रकाश सुर्वे, रविंद्र देवरूखकर , संदिप कुलपे यांचबरोबर ओणी गावचे ग्रामस्थ व भक्त, शिष्यगण उपस्थित होते.
ही रुग्णवाहिका मुंबई गोवा महामार्गावर लांजा ते खारेपाटण व राज्य मार्ग ओणी ते पाचल या दरम्यानच्या अपघात ग्रस्तांसाठी विनामूल्य उपलब्ध करण्यात आली आहे. अपघात झाल्यावर मोफत रुग्णवाहिका सेवेकरिता संपर्क क्रमांक 8888263030 या क्रमांकावर गरजुंनी संपर्क साधावा असे आवाहन जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थान नाणीजधाम तर्फे करण्यात आले आहे.