(नवी दिल्ली)
जर कुणी व्यक्ती एखाद्या महिलेला, मुलीला आवारा, छम्मक-छल्लो, आयटम, चुडैल, कलमुखी, चरित्रहीन यासारख्या शब्दांचा वापर करून बोलत असेल, अथवा अश्लील इशारे करत असेल. ज्यामुळे त्या महिलेला आपमानित झाल्यासारखे वाटत असेल तर आयपीसी ५०९ अंतर्गत त्या व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास अथवा आर्थिक दंड होणार आहे.
तरुणींची छेडछाड, त्यांची सुरक्षितता हा सध्या गंभीर विषय झाला आहे. हिंदू धर्मात महिलांना देवीचा दर्जा दिला जातो. महिलांचा आदर करणे हा सर्व भारतीयांचा धर्म, कर्तव्य आहे. पण आजकाल काही तरुण याला आपला धर्म मानत नाहीत. मुलींची अथवा महिलांची छेड काढण्यातच ते धन्य असतात. अनेकदा महिलांशी बोलताना अपशब्दांचा वापर केला जातो. त्यामुळे महिलांना आपमानकारक वागणूक मिळाल्याचे जाणवते.
आवश्यक जानकारी :~
————————
यदि कोई व्यक्ति किसी स्त्री को आवरा, माल, छम्मक-छल्लो, आइटम, चुड़ैल, कलमुखी, चरित्रहीन जैसे शब्दों से संबोधित करता है या अश्लील इशारे करता है, जिससे उसके लज्जा का अनादर हो। तो उसे आईपीसी की धारा 509 के तहत 3 वर्ष तक जेल/आर्थिक दण्ड या दोनों हो सकता है।
— NCIB Headquarters (@NCIBHQ) December 16, 2022
अनेकदा काही मुली, महिला याबाबत आवाज उठवतात, तर काही महिला लाजेखातर गप्प राहतात. महिलांना, मुलींना अश्लिल कमेंट करणे, काहींसाठी फॅशन झाले आहे. सोशल मीडियावर याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पण अशा लोकांविरोधात पोलिस आणि प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. महिलांची छेड काढल्याचे प्रकरण पोलिसात आल्यानंतर पोलिस त्यांची चांगलीच खातरजमा करतात. न्यायव्यवस्थेतही अशा लोकांविरोधात कठोर कायदे आहेत. तरीही असे लोक सुधारत नाहीत.
मुलींची छेड काढणा-या अशाच रोडरोमियोविरोधात आयपीसी अंतर्गत कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण ब्यूरोने नुकतेच महिलांची छेड काढणा-या रोडरोमिओसंदर्भात ट्वीट केले. त्यामध्ये त्यांनी या रोडरोमिओंना एकप्रकारे थेट करवाईचा इशारा दिला आहे.