( पुणे )
इंग्लंडने नेदरलँड्सचा १६० धावांनी धुव्वा उडवून विश्वचषकाच्या साखळीत दुस-या विजयाची नोंद केली. नेदरलँड्सचे विश्वचषकातील आव्हान आज संपुष्टात आले तर श्रीलंका, बांगलादेश आणि इंग्लंड यांचे आव्हान अधीच संपुष्टात आले होते. इंग्लंडने नेदरलँड्सचा पराभव करत गुणतालिकेत सातव्या स्थानी झेप घेतलीे. त्यासह इंग्लंडने स्वत:ला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या शर्यतीत कायम ठेवले. पराभूत झालेल्या नेदरलँड दहाव्या स्थानी घसरला. दरम्यान, चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान, अफगाणिस्तान यांच्यात चुरस असणार आहे.
गतविजेत्या इंग्लंड आणि नेदरलँड्स यांच्यातील विश्वचषक 2023 चा 40 वा सामना पुण्यातील MCA स्टेडियमवर खेळला गेला. इंग्लंडने नेदरलँड्सचा पराभव करून स्पर्धेतील आपला दुसरा विजय नोंदवला. या पराभवासह नेदरलँड्स विश्वचषकातून बाहेर पडणारा हा चौथा संघ ठरला आहे.
इंग्लंड संघाने विश्वचषकातील आठव्या साखळी सामन्यात शानदार विजय संपादन केला. त्यांनी नेदरलँडचा 160 धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडच्या खात्यात दोन गुण जमा झाले. आठ सामन्यांत त्याचे चार गुण झाले आहेत. इंग्लंडला सहा सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत इंग्लंड दहाव्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, नेदरलँडचा संघ आठ सामन्यांतील सहाव्या पराभवासह विश्वचषकातून बाहेर पडला आहे.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने 50 षटकांत नऊ बाद 339 धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ 37.2 षटकांत 179 धावांवर गारद झाला. नेदरलँड्सकडून फंलदाजीत तेजा निदामनुरूने सर्वाधिक नाबाद 41 धावा केल्या. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने 38 आणि वेस्ली बॅरेसीने 37 धावा केल्या. सायब्रँडने 33 आणि बास डी लीडेने 10 धावा केल्या. इंग्लंडकडून मोईन अली आणि आदिल रशीदने प्रत्येकी तीन बळी घेतले. डेव्हिड विलीने दोन गडी बाद केले. नेदरलँड्स संघाकडून गोलंदाजीत बास डी लीडेने 10 षटकात 74 धावा देताना तीन बळी घेतले. याशिवाय आर्यन दत्त आणि व्हॅन बेक यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या तर व्हॅन मिकरेनला 1 विकेट्स घेतली.
भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे. चौथ्या स्थानावर तीन संघामध्ये स्पर्धा आहे. न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात चौथ्या क्रमांकासाठी लढत आहे. या तीन संघापैकी दोन संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे. उपांत्य फेरीत कोणता संघ पोहचणार.. याकडे लक्ष लागले आहे.
नेट रनरेटमध्ये न्यूझीलंडचा संघ इतर दोन्ही संघाच्या तुलनेत पुढे आहे. न्यूझीलंडचा नेट रनरेट+०.३९८ आहे. न्यूझीलंडचा अखेरचा सामना बेंगळुरूमध्ये श्रीलंकेशी होणार आहे. लंकेचे आव्हान संपुष्टात आले आहे, ते न्यूझीलंडला अडचणीत आणू शकतात. पाकिस्तान+०.०३६) आणि अफगाणिस्तान-०.०३८) असा नेट रनरेट आहे.
दरम्यान, नेदरलँड्सचा १६० धावांनी पराभव करत इंग्लंडने गुणतालिकेत थेट सातव्या स्थानी झेप घेतली. इंग्लंडला आठ सामन्यात सहा पराभवाचा सामना करावा लागला. दोन विजयासह इंग्लंड संघाने गुणतालिकेत सातव्या स्थानी झेप घेतली. इंग्लंड, बांगलादेश, श्रीलंका आणि नेदरलँड्स यांचे समान गुण आहेत. पण इंग्लंडचा नेट रनरेट चांगला आहे. त्यामुळे ते सातव्या क्रमांकावर आहेत. बांगलादेश आठव्या, श्रीलंका नवव्या आणि नेदरलँड दहाव्या स्थानी आहे.