(रत्नागिरी)
शहरातील मिरकरवाडा येथे मच्छि जाळीच्या रिंग चोरल्याच्या गैरसमजातून एकाला लोखंडी रॉड, फायबर रॉड, लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयित ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना गुरुवार २५ मे रोजी सकाळी ९.३० ते १० वा. कालावधीत घडली आहे..
हुजैफ साखरकर, नईम वस्ता, निहाल वस्ता, इम्रान सोलकर, कैफ मुकादम, यासिन मस्तान अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहा संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात फिर्यादीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार फिर्यादीने त्यांच्या मच्छिच्या जाळीच्या रिंगा चोरल्याचा गैरसमज या सहा संशयितांना झाला होता. त्यातूनच त्यांनी फिर्यादीला मिरकरवाडा येथील चौकीच्या मागील बाजूला शिवीगाळ करत जबर मारहाण केली.
या प्रकरणी संशयितांविरोधात भादंवि कायदा कलम १४३, १४७, १४९, ३२४, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.